Tuesday, 11 October 2016

शास्त्र आणि शस्त्र

कालच एक पोस्ट पाहिली. मोदी साहेब दसर्याच्या मुहूर्तावर जवानांशी संवाद साधत होते - आणि लढाईच्या आयुधांची पूजा करताना दाखवले होते. त्यावर पोस्ट वर टिप्पण्णी अशी होती - कि या आधी आपण कधी भारतीय नेत्याला सणाच्या दिवशी जवानांशी संवाद करताना आणि आयुधांची पूजा करताना पाहिले होते का? ती पोस्ट पहाताना लक्षात आले कि आपण असे कधी या पूर्वी पाहिले नाही आणि पाहिले असले तर आता लक्षात नाही. आता सोशल मीडिया मुळे ह्या गोष्टी आपल्या पर्यंत पोहोचू शकतात. 

हि पोस्ट पहाताना एक गोष्ट ध्यानात आली कि जीवनात आयुधे आणि हत्यारे ह्यांचे एक स्थान असले पाहिजे. आपल्या संस्कृतीत शस्त्रे आणि शास्त्रे ह्या दोन्ही गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. देवी देवतांच्या हातात शस्त्रे आणि शास्त्रे दोन्ही धारण केली असतात. शास्त्रे सर्वानी शिकून शिक्षित होणे आवश्यक आहे तेवढेच शस्त्र धारण करून ती चालवण्यात पारंगत होणे तितकेच जरुरी आहे. शास्त्रे स्व:शिक्षणासाठी आणि शस्त्रे स्व:रक्षणासाठी! शस्त्रांचा वापर करण्यासाठी योग्य निर्णय करणे आपसुक आहे ज्यासाठी मन संतुलित असणे आवश्यक आहे - जे शास्त्रे शिकून अवगत करता येते. 

काळाच्या ओघात शास्त्रे हरवली आणि अहिंसे च्या स्वीकृतीनंतर शस्त्रे म्यान केली गेली. प्राचीन महत्त्व पूर्ण ज्ञान विस्मृतीत गेले आणि म्यान केलेल्या शस्त्रांमुळे भारत वर्षातील क्षात्र तेज लोप पावत गेले. दसर्याच्या मुहूर्तावर आलेल्या मोदींच्या पोस्ट मुळे ह्या विचारांना वाचा फुटली. आज उठ सुठ शस्त्रे हातात घेणे योग्य नाही पण निदान देश हित लक्षात न ठेवता सर्जिकल स्ट्राईक वर वाचाळपणे वाट्टेल ते बरळनाऱ्या आपल्या नेत्यांनी, पत्रकारांनी, बॉलीवूड कलाकारांनी आणि तथाकथित सेलेब्रेटीज नी आपल्या जिभेवर ताबा ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे. ह्या वाचाळ वीरांना अशी विनंती आहे कि जिभेचे शस्त्र म्यान करा आणि आयुधे हातात घेऊन निदान सहा महिने लष्करी सेवा करण्यासाठी सीमेवर जा. दसर्याच्या शुभेछा

११ ऑक्टोबर २०१६

No comments:

Post a Comment