Sunday, 19 February 2023
मला आवडलेले पुस्तक - काळोख आणि पाणी (अरुणा ढेरे लिखित)
Wednesday, 16 February 2022
मोडी लिपी - एक आठवण
लहानपणी कोकणात मे महिन्याच्या सुट्टीत गावी जायचो. त्यावेळी अगदी बारावी पास होईपर्यंत मी गावाला जायचो. ऐंशी च्या दशकापर्यंत गावाकडे लाईट न्हवती. त्यामुळे रात्री बैठे खेळ दिव्याच्या अथवा कंदिलाच्या उजेडात खेळले जायचे नाहीतर एखादे गोष्टीचे पुस्तक वाचले जायचे. नऊ च्या दरम्यान जेवण खान आटपून दहापर्यंत झोपी जायचो. गावाकडे पहिले काही दिवस नव्या नवलाई प्रमाणे आसपास फिरण्यात आणि भेटीगाठी करण्यात जायचे. मुंबई ला परते पर्यंत मधला काळ मग फडताळे शोध, पेट्या शोध, पोटमाळे शोध असे करण्यात जायचे. अशा वेळी जुने पुराणे कागदपत्रे हाती लागायची. मला आठवते जुन्या पिवळ्या पडलेल्या वह्या, खतावण्या हाती लागल्या होत्या. त्या म्हणे माझ्या आजोबांनी आणि पणजोबा – खापर पणजोबा ह्यांनी त्यांच्या अक्षरात लिहिल्या होत्या. सर्व मोडी भाषेत. फास्ट लिपी त मोडी लिहिलेले मी अंकलिपी नंतर प्रथमच पाहिले. इंग्रजी प्रमाणे कर्सिव्ह मराठी लिहिता येत होते तर. माझी आजी ते मोडी हळू हळू का होईना पण वाचू शकत होती पण तिची मुले म्हणजे माझे वडील आणि काकाना मोडी कळत न्हवते. त्या पुस्तकात वंशावळ लिहिली होती. देणे घेणे लिहून ठेवले होते, ठळक घटना लिहून ठेवल्या होत्या. पण ज्या पिढीच्या हातात हे दस्तऐवज होते (माझ्यासकट) त्यांना मोडी भाषा समजत न्हवती. मोडी लिपी केवळ एकदोन पिढ्यांमध्ये मोडीत निघाली होती. आधुनिक तथाकथित इंग्रजी शिक्षणापुढे लोकांनी मोडी कडे पाठ फिरवली आणि मोडी भाषेने मान टाकली. आज आम्ही साठी मध्ये असणाऱ्या पिढीला निदान मोडी मराठी भाषा विशिष्ट लिपी सह अस्तित्वात होती हे माहीत आहे पण आमच्या पुढच्या पिढीला कसे माहीत पडणार? दस्तऐवज बघून झाल्यावर आजी ते पुन्हा चौरंगाच्या पेटीत जपून ठेवायला सांगायची. पुन्हा ते पुढच्या वर्षी उघडायचे आणि नजरेखालून घालायचे असा प्रघातच पडला. ह्या वह्या पूर्वजांच्या होत्या, त्या त्यांनी हाताळल्या होत्या, बोरू आणि शाई ने त्यात त्यांनी मराठी मोडी भाषेत मजकूर लिहिला होता ह्या जाणिवेनेच शहारे येत असत. कधी लिहिला असेल मजकूर? ह्या घरात? मुंबईला नोकरीत असतांना ? निवृत्त झाल्यावर? का वेळ मिळेल तेंव्हा ? दिवसा की रात्री दिवा/कंदिलाच्या उजेडात लिहिला असेल? बैठकीचा मेज वापरला असेल का चौरंगाला च मेज केला असेल? बोरू घरीच बनवत असत की बाजारातून आणून ठेवले असतील? आणि शाई? शाई ची पावडर वापरली असेल की द्रव शाई? काही मजकूर शिशाच्या पेन्सिल ने लिहिलेला पण होता.
बारावी नंतर गावी जाणे झाले नाही. पुढे पदवी परीक्षा आणि मग नोकरी. त्यामुळे पूर्वी दरवर्षी गावी जाणे थांबले. पुढे आजी वारली. गाव चे घर पोरके झाले. पुढे जास्त कोणी लक्ष दिले नाही. मोडी लिपीतले ते दस्तऐवज कुठे गेले काही कळले नाही. लोकं अशा गोष्टी जपून ठेवतात. आम्हाला ते जमले नाही. लहानपणी हे दस्तऐवज पहातांना मोडी शिकायची जबरदस्त उर्मी यायची पण ते शक्य झाले नाही. त्या चौरंगाच्या बाजूला जुने ग्रंथ होते – पांडवप्रताप, हरिविजय, रामायण, भागवत वगैरे. त्यांची पारायणे चातुर्मासात अथवा नामसप्ताह सोहळ्यात केली गेली असतील. त्यांना पण माझ्या आजीने, आजोबांनी पंजोबानी हाताळले असेल. ते ग्रंथ पण सापडले नाहीत. काळाच्या ओघात घराच्या आधी ते जीर्ण होऊन अस्त पावले असतील. जुन्या मोजमापाची साधने घरात होती – पायली, शेर, खंडी, मण ह्यांची मापे घरात होती. किलो आणि ग्राम तेंव्हा वापरात न्हवते. कालप्रवाहात ही लाकडी मापे फुटून गेली असावीत. आता कोणाकडे असतील तर ती कोपऱ्यात पडलेली असतील अगदी दगडी जात्याप्रमाणे किंवा लाकडी भात भरडण्याच्या जात्या सारखे.
प्रकाश दिगंबर सावंत
१६ फेब्रुवारी २०२२
Thursday, 27 February 2020
गावाकडची कोळशाची मशेरी आणि काळा चहा
Tuesday, 24 January 2017
आजचे पाश्चात्त्य आणि आपली जुनी संस्कृती
भारतीय संस्कृती आणि विज्ञान किती प्रगत होते. आपल्या लोकांनी ते मौखिक आणि लिखित अशा दोनी रूपात उपलब्ध करून ठेवले होते. परंतु परकीय आक्रमणांनी आपल्या सर्व ज्ञानाचा आणि साहित्याचा नाश केला. इंग्रजानी अतिशय पद्धतशीरपणे आपला इतिहास विकृत केला आणि आपल्या मूळ संस्कृतीपासून इथल्या लोकांना दूर नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले. जेव्हा युरोपात लोक गुहेत राहात होते तेव्हा आपल्याकडे बहरलेली संस्कृती होती, पुढारलेले विज्ञान होते, आपली गुरुकुल शिक्षण पद्धती होती, चार आश्रम होते. जात पात कोणी तरी नंतर घुसडली. विश्वामित्र क्षत्रिय असून तपस्वी झाला होता, लोखंडाचे सोने बनवण्यापर्यंत मजल गेली होती, पारा औषधात आणि विमाने बनवण्यात/चालवण्यात वापरला जात होता. खगोल शास्त्रीय ज्ञान अफाट होते. पंचांग तयार केले जे आज पण अचूक गती दाखवते आहे. अगस्ती आणि भृगु सारख्या मुनींनी पुढे येणाऱ्या कित्येक पिढयांची भविष्ये लिहून ठेवली (उदा. नाडी ज्योतिष), मंत्र तंत्र वापरून अस्त्रे निर्माण केली, वेगवेगळे राग - दिवे लावणारे, पाऊस पाडणारे इथेच निर्माण झाले. चरक सारख्या ऋषींनी कित्येक शल्य क्रिया केल्या. परलोक विद्या पारंगत झाले, जन्म, मृत्यू ,पुनर्जन्म, मोक्ष ह्यासारख्या कल्पना मांडल्या. अगदी कालपर्यंत चाणक्या सारखे विद्वान इथे जन्मले आणि त्यांनी अतिशय उपयुक्त विचार प्रदान केले. पाश्चिमात्यांनी आपणाला आपल्या मूळ ज्ञाना पासून दूर केले. आपण बहकत गेलो. पाश्चिमात्य लोक आता आपल्या पुर्वजांच्या प्रथांकडे आणि ज्ञानाकडे डोळे उघडून पाहू लागले आहेत.
गावाकडे आपण शेण अथवा गोवरी जाळून त्या राखेत मीठ टाकून दात घासत असू - त्यावेळी असल्या मंजनामुळे दाताला इजा पोचेल म्हणून टूथ पेस्ट चे मार्केटिंग केले गेले - आज त्याच कंपन्या आपल्या पेस्ट मध्ये "मीठ" आणि "कोळसा" आहे का विचारत आहेत. गावाकडे हातसडीचे तांदूळ वापरात असत, गुळाची चहा बनवत असत, पाहुणा आला कि गूळपाणी देत असत; मॉर्डन सोसायटीच्या नावाखाली आपल्याला पोलिश केलेल्या तांदळाची आणि कारखान्यात बनवलेल्या गंधक असलेल्या साखरेची सवय लावली गेली. लोणकढी तूप हृदयाला खराब म्हणून वनस्पती तूप - डालडा - उमदा खायची सवय लावली गेली आणि पुढे जेव्हा डालडा हृदयाला हानिकारक असतो आणि रक्त वाहिन्या ब्लॉक करतो हे कळल्यावर ऑलिव्ह तेल, सूर्यफूल तेल प्रमोट करण्यात आले. खोबरेल तेल (नारळा ला आपण कल्पवृक्ष म्हणतो) संपृक्त असल्याने ते पण वाईट असे सिद्ध केलेले लोक आता नारळाच्या तेलाचे गुणगान गात आहेत. मध्यंतरी हळदी (जी आपल्याकडे हळद तुरटी लेप, घसा बसला असल्यास, जखमेवर लावण्यासाठी वापरली जाते) मध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असल्याचा जावई शोध ह्यांनी लावला आणि त्याचे पेटंट घ्यायला निघाले. आपल्या लोकांनी हंगामा केला म्हणून ते झाले नाही. बासमती तांदळाचे पेटंट घेतले गेले आहे. लसूणीचे आणि कोरफडीचे गुणधर्म आता आता ह्यांच्या ध्यानात येऊ लागले आहेत. पुढे जाऊन गवती चहा आणि आल्याचे पण हे लोक पेटंट घेण्याची शक्यता आहे. रासायनिक खते सोडून तिकडे आता "ऑरगॅनिक" फार्मिंग सुरु झाले आहे. आमच्या सुपीक जमिनीचा कस रासायनिक खते वापरून आपणच संपवून टाकला. आमचे ज्ञान चोरायचे आणि ते वापरून बनवलेले पदार्थ अवाच्या सवा दराने (पेटंट घेतल्यामुळे) परत त्याच्या देशातून आम्हालाच विकायचे किंवा फ्र्यान्चाईज द्यायच्या ! आता योग आणि प्राणायाम वर तिकडे संशोधन चालू आहे आणि केवळ प्राणायाम करून बरेच रोग आटोक्यात आणता येतात हे त्यांना कळले आहे.
सध्या जल्लीकट्टू येथे चाललेल्या बैलांच्या खेळाला विरोध केला जात आहे - तसा तो स्पेन मध्ये चाललेल्या खेळाला का केला जात नाही? "पेटा" ह्या संस्थेने का विरोध केला हे कळात नाही. त्यांचा खरोखर चांगला हेतू आहे कि अंतस्थ हेतू वेगळा आहे - कसे कळणार? माझया एका व्हेट मित्राने सांगितले कि इस्त्रायल ने भारतातून वशिंड असलेल्या हजारो भारतीय गायी त्यांच्या देशात आयात केल्या आहेत आणि त्यांची ते जाणीवपूर्वक पैदास करत आहेत. आपल्या इकडे लोक जर्सी गायीचे फ्याड डोक्यात घेऊन बसले आहेत. आता अमेरिकेत पण ह्या देशी भारतीय गायी आणि त्यांचे गोठवलेले गर्भ आयात केले जात आहेत आणि देशी गायीच्या दुधाचे पेटंट घेण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या देशातून इतर गोष्टींप्रमाणे देशी गायीचे उच्चाटन करण्याचा हेतू तर ह्या मागे दडलेला नाही?
संस्कृती आणि प्रगती ह्याचा योग्य ताळमेळ घातला पाहिजे. आपले उत्सव पण आता कमी होत आहेत. दही हंडी फोडू नका, पतंग उडवू नका असे चालले आहे. प्रथा परंपरा मोडून चालल्या आहेत. आपल्या नव्या पिढीला पिझ्झा बर्गर अशा जंक फूड ची सवय लावली गेली आणि तिकडे पुन्हा बरेच लोक शाकाहारी चा उदो उदो करू लागले आहेत. आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे
Sunday, 27 November 2016
चलन बदल = देश बदल?
Tuesday, 11 October 2016
शास्त्र आणि शस्त्र
अमिताभ बच्चन - नॉट आउट 74
सात हिंदुस्थानी हा त्याचा पहिला चित्रपट. त्यानंतर त्याचे चित्रपट येत राहिले आणि पडत राहिले. "आनंद" चित्रपट आला. ह्या चित्रपटात त्याने फक्त ५००० रुपयात काम केले. ५००० रुपये त्यावेळी त्याची कोलकत्त्या मधल्या नोकरीमधला ३ महिन्याचा पगार होता! कारण त्याचा "आतला आवाज" सांगत होता की तुला इथेच काहीतरी करायचे आहे . "आनंद" मध्ये जरी राजेश खन्ना भाव खाऊन गेला तरी उंच, शांत आणि गंभीर असणारा डॉक्टर भास्कर आणि शेवटी ज्यावेळी आनंद मारतो त्यावेळी ज्वालामुखीसारखा भडकणारा "बाबू मोशाय" डॉक्टर भास्कर पब्लिकच्या लक्षात राहिला. त्यानंतर त्याचे काही आणखी चित्रपट आले - महमूद ने त्याला "बॉंबे तो गोवा" मध्ये चान्स दिला. १९७३ ला "जंजीर" आला. जंजीर नंतर एक वादळ बॉलीवूड वर पसरले - अँग्री यंग मॅन ह्या नावाने त्या वादळाने धुमशान मांडले - भले भले स्टार रुपी वृक्ष उखडले गेले - बॉलीवूड च्या तारांगणात एकच सूर्य तळपू लागला आणि बाकी सारे सितारे निष्प्रभ झाले. एके काळी रेडिओ सिलोन ने नाकारलेला आवाज अचानक भारदस्त असल्याचा साक्षात्कार इथल्या लोकांना झाला. पुढे "नमक हराम" आला - तो पाहिल्यानंतर आमच्या पिढीची त्यावेळची प्रतिक्रिया होती कि " अमिताभ ने राजेश खन्ना ला कच्चा खाऊन टाकला". राजेश अमिताभ त्यानंतर एकत्र कधी दिसले नाहीत (नशीब चित्रपटाच्या गाण्याच्या एका सिक्वेन्स मध्ये दिले तेवढेच). त्यानंतर तो कामात अतिशय व्यग्र झाला. एके काळी वरळी सी फेस वर चकरा मारत वेळ कसा काढायचा हा प्रश्न त्यावेळी पडलेल्या अमिताभ ला आता दिवसाचे २४ तास पण कमी पडू लागले असतील. यशाच्या अफाट उंचीवर तो पोचला पण पाय जमिनीवर ठेवले. बॉलीवूड मध्ये यशाच्या शिखरावर असताना सेट वर दिलेल्या वेळी हजर असणारा तो एकमेव कलाकार असायचा. प्रोफेशनॅलिसम म्हणजे काय ते त्याने दाखवून दिले. आता हरिवंश राय बच्चन ह्यांना अमिताभ बच्चन चे वडील म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलांच्या नावाने आपली ओळख करून दिली जावी अशी आई - बापाची इच्छा असते - अमिताभ ने ती पूर्ण केली. अमिताभ ला आपल्या वडिलांबद्दल अतिशय आदर होता. तो त्याच्या वागण्या बोलण्यातून - मुलाखतीत जेव्हा जेव्हा त्याच्या वडिलांचा उल्लेख येई तेव्हा तेव्हा तो आदर प्रकर्षाने जाणवत राहातो. त्यांच्या कविता जेव्हा अमिताभ सादर करतो तेव्हा वाटते कि खोल अर्थ असणाऱ्या हरिवंश राय ह्यांच्या कविता वाचण्यासाठी आणि सादर करण्यासाठी त्यांचा मुलगा अमिताभ ह्याचा गहिरा आवाज योग्य आहे ह्याची खात्री होते.
1973 च्या जंजीर प्रदर्शित झाल्यानंतर चार दशकाहून जास्त काळ उलटला - अमिताभ चे गारुड अजून तसेच आहे. मध्यंतरी तो कठीण कालखंडातून गेला. घरावर जप्ती यायची वेळ आली. रात्रीची झोप उडाली त्याची. परत कंबर कसून उभा राहिला. कदाचित कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही असे त्याने ठरवले असावे. चित्रपट असो, जाहिरात असो, करोडपती सारखा प्रायोजित कार्यक्रम असो - सर्व त्याने स्वीकारले आणि यशस्वी करून दाखवले आणि त्याबरोबर स्वतः यशस्वी झाला. महानायक झाला. त्याच्या हि आयष्यात चढ उतार , सुख दु:ख, यश अपयश असे सर्व प्रसंग आले. सुरवातीला रेडिओ वर मिळालेला नकार, उंट आणि घोड्याचे तोंड असणारा लंबू नातं अशी झालेली हेटाळणी, नंतर मिळालेले अफाट यश, प्रेमाचा त्रिकोण, जीवघेणा अपघात, राजकारणात प्रवेश आणि तिथे मिळालेले अपयश, पुन्हा चित्रपट पण चुकीच्या निवडीमुळे अपयश, त्याच्या कंपनीचे वाजलेले दिवाळे, त्यातून पुन्हा चित्रपटाकडे आणि कौन बनेगा करोडपती सारख्या कार्यक्रमाकडे - पुन्हा वयाला साजेशे चित्रपट करण्याकडे आणि त्यानंतर प्राप्त केलेले स्थेर्य. तो सतत संघर्ष आणि प्रयत्न करत राहिला. त्याच्या ह्या संघर्षाचे मुळे आपल्या सारख्या सर्व सामान्यांना तो आपल्यातलाच एक वाटतो. त्याचे महानायक होणे असे सोपे न्हवतेच मुळी. एवढा मोठा होऊन हि " डाऊन टू अर्थ", " सॉफ्ट स्पिकिंग", "सुसंस्कृत" अशी खास ओळख त्याने कायम ठेवली
असे मी कुठे तरी वाचले होते की - सात हिंदुथानी जेव्हा रिलीज झाला होता त्यावेळी अमिताभ च्या उंची ची तर उडवणारे एक कार्टून त्यावेळी पब्लिश झाले होते - त्यात भारताचा नकाशा दाखवला गेला होता - त्यावर सहा हिंदुस्थानी झोपलेले दाखवले होते (पडेल चित्रपटाचे प्रतीक) आणि एक उंच माणूस (म्हणजे अमिताभ) मध्यभागी उभा दाखवला होता. १९६९-७० ला चित्रपटाची आणि अमिताभ ची टर उडवणारे हे कार्टून पुढे १९७३-७४ नंतर एक सत्य ठरले - त्यावेळी बॉलीवूड च्या साम्राज्यावर नव्हे तर पूर्ण हिंदूस्थानभर एकच उंच व्यक्तिमत्त्व ठळकपणे उभे होते आणि ते म्हणजे अमिताभचे. एका चॅनेल च्या अवार्ड फंक्शन मध्ये राजेश खन्ना ला अमिताभ हस्ते " लाईफ अचिव्हमेन्ट अवार्ड" देण्यात आले. बर्याच दिवसांनी त्यांना एकत्र स्टेज वर पाहायला मिळाले. त्यावेळी भावूक झालेल्या राजेश ला जुने स्पर्धेचे आणि त्याचे सोनेरी दिवस नक्कीच आठवले असतील - एके काळी तो सुपरस्टार होता आणि अमिताभ आता महानायक होता. टाइम हॅज चेंज्ड. पालटलेले दिवस आणि पलटलेली वेळ त्याने अनुभवली होतीच - त्या एके काळी सुपरस्टार असताना त्याला अमिताभ चे वर्चस्व मान्य झाले नसेल, पण वेळ बदलत असते, प्रत्येकाचे दिवस येतात आणि जातात. सुपरस्टार पद मिळाल्यावर राजेश स्वतःला देव समजू लागला होता. तो स्वत:च म्हणाला होता " वयाच्या २१-२२ व्या वर्षी मी एवढा प्रसिद्ध झालो, लोक- मुली माझ्याचसाठी वेडे झाले होते, माझाच सर्वत्र उदो उदो होत होता, त्यामुळे मला मी खरोखर देव झाल्यासारखेच वाटायला लागले होते". यश हातात आल्यावर अमिताभ बहकला न्हवता - यशाची नशा त्याच्या डोक्यात गेली न्हवती. कदाचित अमिताभ च्या मनात गुरु दत्त च्या " कागज के फूल" ची कथा खोलवर रुतून बसली असावी. इथले यश तकलादू आहे, इथली दुनिया बेगडी आहे, इथे फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतात आणि मावळत्या सूर्याकडे पाठ करतात ह्या सर्वाची त्याला जाणीव असावी आणि सुरुवातीला जे टक्के टोपणे खाले त्यामुळे तो अधिक मॅच्युयर झाला असावा. फक्त ठराविक सहकलाकारांशी मैत्री कायम ठेवत बॉलीवूड च्या ह्या झगमगत्या दुनियेत त्याने अलिप्तपणा जपला. लाईफ अचिव्हमेन्ट च्या अवार्ड फंक्शन च्या वेळी राजेश ला मागचे दिवस आठवले असतील. समारोप करताना अमिताभ कडे आणि प्रेक्षकांकडे बघत तो म्हणाला होता " कल जहाँ मैं था वहा आज कोई और हैं - कल जहाँ मैं था वहा आज कोई और हैं - वो भी एक दौर था ये भी एक दौर है"
"आतला आवाज" ऐकून त्याचा ध्यास घेणारे लोक कमी असतात - व्यवहाराच्या शुष्क रगाड्यात प्रायोरिटी बदलतात आणि हा आतला आवाज मागे पडतो आणि शेवटी दबून जातो. काही लोक ह्या "आतल्या आवाजाने" जे सांगितले आहे ते करण्याचा ध्यास घेतात - त्याचा पाठपुरावा करतात आणि असे केल्याने जे काही साकार होते त्याचा अविष्कार महान असतो. अमिताभ ने ते साध्य केले आणि तो महानायक झाला.